भीमा-कोरेगाव प्रकरणात ८ जणांविरुद्ध एफआयआर

0
270

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) भीमा कोरेगाव प्रकरणात ८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा, हॅनी बाबू, सागर गोरखे, रमेश गैचोर, ज्योती जगताप, स्टॅन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. भीमा कोरेगावमध्ये २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी काल एनआयएने स्टॅन स्वामी यांना झारखंडमध्ये अटक केली.

त्यापाठोपाठ आठ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव मध्ये हिंसाचार उसळला होता. त्यापूर्वी एक दिवस पुण्यातल्या शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात या हिंसेचे मूळ आहे असा पुणे पोलिसांचा आरोप आहे. पुणे पोलिसांनी गौतम नवलाखा, सुधा भारतद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि व्हर्नोन गोन्साल्विस यांना अटक केली. त्यानंतर इतरांनाही अटक करण्यात आली. काल या प्रकरणी एनआयएने आठ जणांना अटक केली.

दरम्यान काल एनआयएने मोठी कारवाई करत सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी (८३) यांना झारखंडमधून अटक केली आहे. त्यांची जवळपास २० मिनिटे कसून चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.