चोवीस तासांत पुन्हा ७ बळी

0
276

>> राज्यात कोरोनाचे नवे ४८९ पॉझिटिव्ह

राज्यात चोवीस तासात नवे ४८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ७ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या बळींची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून कोरोना बळी एकूण संख्या ४९१ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ५९१ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ४७८३ एवढी झाली आहे.

गेल्या चोवीस तासांत ४१५ कोरोना रूग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३२ हजार ३१७ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९७ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणखी २२१ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला असून होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या १८ हजार २०१ एवढी झाली आहे. इस्पितळामध्ये नवीन ९९ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. कोविड प्रयोगशाळेत १८४३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

आणखी ७ जणांचा बळी
राज्यात आणखीन ७ कोरोना रुग्णांचे निधन झाले आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ४९१ झाली आहे. गोमेकॉमध्ये ६ रुग्णांचे आणि १ रुग्णाचे मडगाव येथील हॉस्पिसियू इस्पितळात निधन झाले. बार्देश येथील ७२ वर्षांचा पुरुष रुग्ण, सांकवाळ येथील ५५ वर्षांची महिला रुग्ण, फोंडा येथील ७८ वर्षांची महिला रुग्ण, सावईवेरे येथील ६० वर्षांचा पुरुष रुग्ण, बाणावली येथील ८० वर्षांची महिला रुग्ण, मये येथील ७३ वर्षांची महिला रुग्ण, फातोर्डा येथील ५१ वर्षांच्या पुरुष रुग्णांचे निधन झाले आहे.

पणजीत नवे २८ रुग्ण
पणजी परिसरात नवे २८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पणजीतील एकूण रुग्णांची संख्या १९३ एवढी झाली आहे.

दरदिवशी
सरासरी ७ बळी

राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या नऊ दिवसांत ६३ जणांचा बळी गेली आहे. दरदिवसाला सरासरी सात कोरोना रुग्णांचा बळी जात आहे. बार्देश तालुक्यात सर्वाधिक १४ कोरोना बळीची नोंद झाली आहे. तिसवाडी तालुक्यात ११ बळी, सासष्टी तालुक्यात १० बळी, फोंडा तालुक्यात ९ बळी, केपे तालुक्यात ७ बळी, मुरगाव तालुक्यात ५ बळी, काणकोण तालुक्यात ३ बळी, डिचोली तालुक्यात २ बळी, सांगे आणि पेडणे तालुक्यात प्रत्येकी १ बळीची नोंद झाली आहे.