Home बातम्या भारत – पाकिस्तानमध्ये अण्विक सुविधा यादीचे आदान प्रदान

भारत – पाकिस्तानमध्ये अण्विक सुविधा यादीचे आदान प्रदान

0

भारत व पाकिस्तानने जुन्या करारानुसार काल आपापल्या देशातील आण्विक प्रकल्पांच्या माहितीचे आदान-प्रदान केले.

गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंच्या तज्ज्ञांदरम्यान अणुविषयक परस्पर विश्‍वास निर्माण प्रक्रियेवर चर्चा झाली होती. त्यानंतर काल नवी दिल्ली व इस्लामाबाद येथे दूतावासांमध्ये दोन्ही देशांमधील अणूप्रकल्प तसेच आण्विक सुविधांच्या माहितीची देवाण घेवाण करण्यात आली.

गेल्या २१ वर्षांपासून अशाप्रकारे माहितीचे आदान प्रदान करण्यात येते.

युद्धकाळात एकामेकाच्या अणूप्रकल्पांवर हल्ले करू नयेत यासाठी करारान्वये ही माहितीची देवाण घेवाण करण्यात येते.

दरम्यान, दोन्ही देशांनी एकामेकांच्या कैद्यांची माहितीही एकामेकाला दिली.