भारत-जपान यांच्यात प्रथमच द्विपक्षीय नाविक कवायती ९ ते १० जून दरम्यान जपानमध्ये होणार आहेत. या कवायतींसाठी भारतीय नौदलाची चार जहाजे जपानला रवाना होणार आहेत. जपानच्या समुद्रावर या संयुक्त कवायती होणार आहेत.
भारताचे संरक्षणमंत्री ए. के. अँटर्नी गेल्या नोव्हेंबरमध्ये जपान भेटीवर गेले असता त्या दरम्यान या कवायतींबाबत निर्णय झाला होता. या कवायती म्हणजे उभय देशांमधील संरक्षण सहकार्याचा भाग आहे.