इराण-अमेरिका-इस्रायल तणाव असाच कायम राहिल्यास त्याचा विविध क्षेत्रांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. या युद्धाचे परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांवरही उमटायला लागले आहेत. युद्धामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका होऊन भारतात महागाई वाढू शकते अशी शक्यता व्यक्त होत आहे. या युद्धामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका उडण्याची दाट शक्यता आहे. सध्या ब्रेंट क्रूड 75 डॉलर प्रतिबॅरलच्या आसपास आहे. मात्र, युद्ध लांबल्यास हे दर 120 ते 130 डॉलरपर्यंत जाऊ शकतात. यामुळे सध्या 95 ते 105 रुपयांच्या दरम्यान असलेले पेट्रोल थेट 120 ते 135 रुपये प्रतिलिटर होण्याची दाट शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत प्रत्येक 1 डॉलरची वाढ भारताचे आयात बिल 12,000 ते 16,000 कोटी रुपयांनी वाढवते. यामुळे रुपया कमजोर होऊन प्रति डॉलर 92 ते 96 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचू शकतो.
मध्य-पूर्वेत तणाव
मध्यपूर्वेत सुरू असलेला तणाव, विशेषतः इराण आणि इस्त्रायल यांच्यात वाढत चाललेला संघर्ष, आता दक्षिण आशियातही जाणवू लागला आहे. अशा प्रकारच्या आंदोलनांचा विविध स्तरांवर परिणाम होऊ शकतो.
आखाती देशांकडून
हवाई क्षेत्र तात्पुरते बंद
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर अनेक आखाती देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे. यामुळे देशातील प्रमुख विमानतळांसह मुंबई विमानतळावरील विमान उड्डाणे रद्द केली आहेत.
जगभरातील हवाई
वाहतुकीवर परिणाम
इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरातील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. विमानांची वाहतूक कोलमडल्याने विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले आहेत. यातच विमान उड्डाणे रद्द झाल्याने हजारो लोकांना त्याचा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.