भारतात सर्वात मोठी लसीकरण मोहीम

0
160

>> ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी ‘मन की बात’ मध्ये लॉकडाउनच्या वर्षपूर्तीनिमित्त काही आठवणींना उजाळा दिला. यावेळी मोदी यांनी भारत हा जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे, ही सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये, गेल्या वर्षी मार्चमध्येच देशाने पहिल्यांदा जनता कर्फ्यू हा शब्द ऐकला. महान देशातील जनतेच्या शक्तीची अनुभूती म्हणजे जनता कर्फ्यू हा संपूर्ण देशासाठी आदर्श उदाहरण ठरला. शिस्तीचे हे अभूतपूर्व असे उदाहरण होते. येणार्‍या पिढ्यांना या गोष्टींचा गर्व वाटेल, असे सांगितले.

त्याचप्रमाणे कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ आपण वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या आणि लावलेले दिवे, हे कोरोना योद्ध्यांच्या ह्रदयाला स्पर्श करून गेले. त्यामुळेच कोरोना योद्धे संपूर्ण वर्षभर न थकता, न थांबता सेवा करत देशाच्या प्रत्येक नागरिकाचा प्राण वाचवण्यासाठी लढत राहिल्याचे सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी विविध क्रीडा प्रकारात ठसा उमटवणार्‍या खेळाडूंचे अभिनंदन केले. मार्चमध्ये महिला दिन साजरा करत असताना अनेक महिला खेळाडूंनी विक्रमांची नोंद केल्याचे मोदी यांनी सांगितले.