भामट्यांच्या शोधासाठी पोलीस पथक मुंबईला

0
105

‘ऑल ब्रॅण्ड प्रोमोशन’ नावाची कंपनी स्थापन करून गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रु. घेवून पळ काढलेल्या भामट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक मुंबईला पाठवण्यात आले असल्याचे काल पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी सांगितले. या भामट्यांने गोव्याबरोबरच गुजरात तसेच अन्य काही राज्यांत फसवले असल्याची माहिती हाती आलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांना पकडण्यासाठी गोवा पोलीस दिल्ली, मुंबई व गुजरात पोलिसांच्या संपर्कात आहेत.