ऑक्टोबरच्या प्रारंभी आपच्या आणखी उमेदवारांची घोषणा

0
89

आम आदमी पार्टी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आणखी ८ ते १० उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचे काल पक्षांतील सूत्रांनी सांगितले. पक्ष टप्प्या टप्प्याने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार असून १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व चाळीसही उमेदवारांची नावे घोषित केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे १ ऑक्टोबर रोजी २ दिवसांच्या गोवा भेटीवर येणार आहेत. मात्र, ऐनवेळी काही कारणामुळे त्यांच्या दौर्‍यात बदल होऊ शकतो. या भेटीत त्यांचा कार्यक्रम अद्याप निश्‍चित झाला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट
केले.
दरम्यान, आम आदमी पार्टीने सर्व मतदारसंघात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले
आहे.
पैकी २६ मतदारसंघांत हे काम बर्‍याच पूर्वी सुरू झाले होते. तर उर्वरित १४ मतदारसंघांत हे काम गेल्या १५ दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे.