भाजपला स्वातंत्र्यसैनिकांचा आदर नाही

0
69

>> लोहिया पुतळाप्रकरणी कॉंग्रेसची टीका

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारला गोवा मुक्तीसाठी सर्वस्व दिलेल्या हुतात्मांबद्दल तसेच स्वातंत्र्य सैनिकांबद्दल प्रेम व आदर नसल्याचा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. लोहिया मैदानावरून गायब झालेला डॉ. लोहियांचा पुतळा काल कंत्राटदाराच्या गोदामात सापडल्याचे चोडणकर म्हणाले. सरकारने जर हुतात्मा स्मारक येत्या २४ तासांत सुरक्षित स्थळी हलवले नाही तर कॉंग्रेस कार्यकर्ते ते सुरक्षित स्थळी हलवतील, असा इशाराही चोडणकर यांनी दिला.