Home बातम्या भाजपला बाहेरून पाठिंब्याचाच सर्वोत्तम पर्याय होता : पवार

भाजपला बाहेरून पाठिंब्याचाच सर्वोत्तम पर्याय होता : पवार

0
भाजपला बाहेरून पाठिंब्याचाच सर्वोत्तम पर्याय होता : पवार

निवडणूक प्रचारादरम्यान काका-पुतण्यापासून (शरद पवार-अजित पवार) महाराष्ट्राला वाचवा, असे मतदारांना आवाहन करणार्‍या व नेचरल करप्ट पार्टी (एनसीपी) अशा शब्दात राष्ट्रवादी पक्षाची निर्भत्सना करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपाला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देणे हाच सर्वोत्तम पर्याय होता, अशी मखलाशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल येथे केली. एका कॉंग्रेस नेत्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना अशा युतीचा प्रस्ताव दिल्याचाही गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.‘महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये आमच्यासमोर भाजपाला बाहेरून पाठिंबा देणे हाच सर्वोत्कृष्ट पर्याय होता’ अशी प्रतिक्रिया पवार यांनी आपल्या पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांसमोर बोलताना केली. त्याआधी विधीमंडळ नेतेपदी त्यांचे पुतणे अजित पवार यांची निवड करण्यात आली.
प्रमुख पक्षांनी मिळवलेल्या जागांची संख्या पाहिल्यास कोणतीही युती जुळणारी नव्हती असेही पवार म्हणाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की एका कॉंग्रेस नेत्याने आपल्याशी फोनवरून संपर्क साधला व कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशा युती सरकार स्थापनेचा प्रस्ताव दिला. त्यांना आपण सांगितले की तसे करायचे झाल्यास आपले एकूण संख्याबळ १४६ एवढे होईल. त्यामुळे स्थिर सरकारसाठी ते पुरेसे ठरणार नाही. (जादुई आकडा १४५ असला तरी) या संख्या बळासाठी भाजपला २२ जागा कमी पडतात.