बोर्डा आरसीसीला अजिंक्यपद

0
87

>>सौरभ सरदेसाई अंडर-१६ क्रिकेट

अकरा वर्षीय सनथ नेवगीच्या संयत ४५ धावा आणि त्याने सनथ प्रभुदेसाईच्यासाथीत (नाबाद २८) केलेल्या ५९ धावांच्या भागीवर बोर्डा आरसीसीने पणजी आरसीसीवर ७ गडी राखून मात करीत वास्को वॉरियर्स क्रिकेट अकादमी आयोजित सौरभ सरदेसाई स्मृति अंडर-१६ इंटर आरसीसी क्रिकेट जेतेपद प्राप्त केले.
चिखली येथील साग मैदानावर झालेल्या अंतिम मुकाबल्यात प्रथम फलंदाजी केलेल्या पणजी आरसीसीला ४३ षटकात १५५ धावांवर रोखले. बोर्डा आरसीसीचा ऑफस्पिनर साईश सातार्डेकर (३-३०) आणि लेगस्पिनर सुबर बोरकर (३-४७) यांनी प्रत्येकी ३ बळी तर अनिरुध्द भट आणि प्रलव केरकर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. पणजी आरसीसीतर्फे पालकर (३१) आणि सागर वांटामुरी (२७) यांनीच थोडा प्रतिकार दर्शविला.
१५६ धावांच्या पाठलागातील बोर्डा आरसीसीचा कुशल सिंग (१२) धावचित झाला पण सनथ नेवगीने अनिश म्हाड्डोळकरच्यासाथीत (१९) ४० धावांची भागी करीत डाव सावरला आणि नंतर सनथ प्रभुदेसाईच्यासाथीत (नाबाद २८) अर्धशतकी भागी नोंदवित संघाचा विजय निश्‍चित केला. पणजी आरसीसीतर्फे विश्‍वा गजीनकर, हितेश तलवार आणि हर्ष जेठाजी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक : पणजी आरसीसी ४३ षटकात सर्वबाद १५३ (युवराज पालकर ३१, सागर वांटामुरी २७, कुबल २०, केतन नांद्रेकर नाबाद १९ धावा, साईश सातार्डेकर ३-३०, सुबव बोकर ३-४७ बळी) प. वि. बोर्डा आरसीसी ४१ षटकात ५ बाद १५६ (सनथ नेवगी ४५, सनथ प्रभुदेसाई नाबाद २८, अनिश म्हाड्डोळकर १७, प्रलव केरकर १७ धावा, विश्‍वा गजीनकर १-९, हितेश तलवार १-३०, आनंद तेंडुलकर १-१४ बळी).