दिल्लीची हैदराबादवर ७ गडी, ११ चेंडू राखून मात

0
88

ऋषभ पंत (नाबाद ३९) आणि संजू सॅमसन (नाबाद ३४) या भारतीय युवा फलंदाजांनी जिगरबाज खेळीत केलेल्या अविभक्त ७२ धावांच्या भागीवर पाहुण्या दिल्ली डेयरडेविल्सने सनरायझर्स हैदराबादवर ७ गडी आणि ११ चेंडू राखून मात करीत आयपीएलमधील तीन सामन्यातील विजयीदौड खंडित केली.

राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवरील या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरीत यजमान हैदराबादला ८ बाद १४६ धावांवर रोखले आणि नंतर १८.१ षटकात ३ बाद १५० धावा नोंदवित संघाचा सहावा विजय नोंदला. या विजयासह दिल्लीने १० सामन्यागतीर १२ गुणासह चौथे स्थान मिळविले तर सनरायझर्स संघ ११ सामन्यातील १४ गुणासह अग्रस्थानावर आहे.
१४७ धावांच्या पाठलागाच्या उद्दिष्टाच्या पाठलागातील दिल्लीचा सलामीवीर मयंक अगरवाल (१०) चौथ्या षटकात नेेहराच्या गोलंदाजीवर स्वस्तात बाद झाला. तथापि, क्विंटन डी कॉक ( ३१ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारासह ४४) आणि करुण नायर (२०) यांनी दुसर्‍या यष्टिसाठी ५५ धावांची भागी नोंदवित डाव सावरला. ही जोडी धोकादायक ठरणार असे वाटत असतानाच दहाव्या षटकात हेन्रिक्सने तीन चेंडूच्या अंतरात नायर आणि डिकॉकला बाद करून ३ बाद ७८ अशी स्थिती बनविली.
तथापि, भारताचा अंडर-१९ खेळाडू ऋषभ पंत (२६ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद ३९) संजू सॅमसनच्यासाथीला (२६ चेंडूत २ षटकारासह नाबाद ३४) आला आणि उभयतानी अविभक्त ७२ धावांची भागी नोंदवित दिल्लीचा विजय झळकविला.
तत्पूर्वी, दिल्लीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरीत यजमान हैदराबादला ८ बाद १४६ धावांवर रोखले. प्रथम फलंदाजीस पाचारण केलेल्या सनरायझर्सला दमदार प्रारंभ करून देताना सलामीवीर शिखर धवन (३७ चेंडुत ३४) आणि कर्णधार डेविड वॉर्नर (३० चेंडूत ४६) यांनी ६७ धावांची सलामी दिली. उभयतानी ‘पॉवरप्ले’मध्ये ५१ धावा जमविल्या. धोकादायक बनत चाललेली ही जोडी फोतडनाना जयंत यादवने नवव्या षटकात ऑस्ट्रेलियन सलामीवीराला ़ित्रफळाचित केले. चार षटकानंतर धवनही (३४) अमित मिश्राच्या गोलंदाजीवर सॅमसनकरवी झेलबाद झाला. नंतर युवराज सिंह (८), हेन्रिक्स (०) स्वस्तात बाद झाले आणि धावबहरावर नियंत्रण आले. केन विलियम्सन (२४ चेंडूत २७) आणि दीपक हुडा (१०) यानी संघाला १४६ धावांची मजल गाठून दिली.

धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : डेविड वॉर्नर त्रि. गो.यादव ४६, शिखर धवन झे. सॅमसन गो. मिश्रा ३४, केन विलियम्सन त्रि. गो. मॉरिस २७, युवराज सिंह झे. पंत गो. मिश्रा ८, हेन्रिक्स पायचित गो. शामी ०, दीपक हुडा हिटविकेट गो. कुल्टरनायल १०, नमन ओझा झे. सॅमसन गो. कुल्टरनायल ७, भुवनेश्‍वर कुमार धावचित १, बरिंदर सरन नाबाद १, आशिश नेहरा नाबाद १, अवांतर ११, एकूण २० षटकात ८ बाद १४६., गडी बाद क्रम : १/६७, २/९८, ३/११३, ४/११४, ५/१३५, ६/१३७, ७/१३८, ८/१४३., गोलंदाजी : यादव ४/०/३२/१, कुल्टर नायल ४/०/२५/२, मोहम्मद शामी ३/०/२६/१, ख्रिस मॉरिस ४/०/१९/१, जेपी डयुमिनी २/०/१९/०, अमित मिश्रा ३/०/१९/२.
दिल्ली डेयर डेविल्स : क्विंटन डीकॉक झे. ओझा गो. हेन्रिक्स ४४, मयंक अगरवाल झे. युवराज गो. नेहरा १०, करूण नायर त्रि. गो. हेन्रिक्स २०, संजू सॅमसन नाबाद ३४, ऋषभ पंत नाबाद ३९, अवांतर ३, एकूण १८.१ षटकात ३ बाद १५०., गडी बाद क्रम : १/२०, २/७५, ३/७८. ,गोलंदाजी : भुवनेश्‍वर कुमार ४/०/३२/०, आशिश नेहरा ३/०/२३|१, बरिंेदर सरन २/०/२१/०, मुस्ताफिजूर रेहमान ४/०/३९/०, हेन्रिक्स ३/०/१९/२, हुडा १/०/५/०, युवराज सिंह १.१/०/११/०.