बॅडमिंटनपटू उपउपांत्यपूर्व फेरीत

0
61

पी.व्ही. सिंधूसह भारताच्या इतर आघाडीच्या बॅडमिंटन खेळाडूंनी काल बुधवारी वैयक्तिक प्रकारातील सामने जिंकत स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंधूने केवळ १८ मिनिटात फिजीच्या आंद्रा व्हाईटसाईड हिला २१-६, २१-३ असे पराजित केले. पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे सिंधू मिश्र सांघिक प्रकारात खेळली नव्हती. या प्रकारात भारताने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता.

द्वितीय मानांकित सायनाने मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या प्रमुख खेळडूचा भार उचलल्यानंतर काल एकेरीत आपला तडाखा कायम ठेवत आफ्रिकेच्या एल्सी डीव्हिलियर्सला २१-३, २१-१ असे पराजित केले. रुत्विका गड्डे हिने घानाच्या ग्रेस अटिपिका हिला २१-५, २१-७ असे हरवून बाहेरचा रस्ता दाखविला. पुरुषांमध्ये श्रीकांतने आतिश लुबाह याचे आव्हान २१-१३, २१-१० असे परतवून लावले.
अन्य भारतीयांचे निकाल ः एच.एस. प्रणॉय वि. वि. ख्रिस्तोफर जॉन पॉल २१-१४, २१-६, सात्विकसाईराज रंकीरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा वि. वि. बेन लेन व जेसिका पुघ २१-१७, २१-१६, प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी वि. वि. बर्टी मोलिया व कॅरन गिब्सन २१-८, २१-९.

आजचे सामने ः अंतिम १६ ः सात्विकसाईराज रंकीरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा वि. क्रस्टन त्साय व नाईल याकुरा, प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी वि. डॅनी क्रिस्नाटा व क्रिस्टल वॉंग, रुत्विका गड्डे वि. जिया मिन येव, एच.एस प्रणॉय वि. अँथनी ज्यो, किदांबी श्रीकांत वि. निलुका करुणारत्ने, पी.व्ही. सिंधू वि. वेंडी चेन, सायना नेहवाल वि. जेसिका ली, सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी वि. आतिश लुबाह व ख्रिस्तोफर पॉल, सिक्की रेड्डी व अश्‍विनी पोनप्पा वि. ओंग रेन नी व क्रिस्टल वॉंग