Home बातम्या बीएसएफचा 1 जवान पाक रेंजर्सच्या ताब्यात

बीएसएफचा 1 जवान पाक रेंजर्सच्या ताब्यात

0

देशात एकीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाने सीमारेषा ओलांडली. सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या भारतीय सैन्य दलाच्या जवानाला पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतले आहे. फिरोजपूर स्थित सीमारेषेवरील ही घटना असल्याचे समजते. सीमारेषेवरील शेतकऱ्यांच्या देखभालीसाठी दोन बीएसएफ जवान तैनात करण्यात आले होते. त्यापैकी, एका जवानाने सीमारेषा पार केल्याने तो पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात गेला आहे. सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या जवानाला सोडवून आणण्यासाठी फ्लॅट बैठका घेण्यात येत आहेत.