बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांची निदर्शने

0
120

>> थकीत वेतन त्वरित देण्याची मागणी

>> साखळी पद्धतीने धरणे व निदर्शने

बीएसएनएलमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना गेल्या ५ महिन्यांचे वेतन न मिळाल्याने कालपासून या कर्मचार्‍यांनी साखळी पद्धतीने निदर्शने करण्याचा निर्णय घेतला.

काल पहिल्या दिवशीच्या धरणे व निदर्शनाच्या कार्यक्रमात सुमारे २० कर्मचारी सहभागी झाले होते. सर्व महिन्यांचे थकीत वेतन विनाविलंब देण्यात यावे, अशी मागणी निदर्शकांनी यावेळी केली.

कंत्राटदार कर्मचार्‍यांच्या प्रोव्हिडंट फंड व इएसआयएसचे पैसेही भरत नसल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. त्यासाठीचे पैसे कापून घेऊनही ते भरले जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या शिष्टमंडळाने कंपनीच्या मुख्य सरव्यवस्थापकांची काल भेट घेतली. यावेळी मुख्य सरव्यवस्थापकांनी कर्मचार्‍यांचे थकीत वेतन ताबडतोब देण्याचे आश्‍वासन दिले, असे फोन्सेका यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.