बिहारमध्ये मंगळवारी संपलेल्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 68.65 टक्के मतदान झाले असून, हे आतापर्यंतचे ऐतिहासिक मतदान ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही टप्प्यांतील सरासरी मतदानाची टक्केवारी नंतर जाहीर केली जाणार आहे. तथापि, दुसऱ्या टप्प्यातील मतदानानेच 1998 मधील 64.6 टक्क्यांच्या विक्रमी मतदानाचा आकडा मोडीत काढला, असे निवडणूक आयोगाने सांगितले. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी सरासरी मतदानाची टक्केवारी 65 टक्क्यांहून अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.