राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून इतर सर्वं प्रकारची दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट खुली ठेवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
सध्या लागू असलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी केल्यास लॉकडाऊनची गरज नाही. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने सोमवार १० मे रोजी सकाळपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, हॉटेल, रेस्टॉरंटमधील ५० टक्के सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यातून केवळ अन्नपदार्थार्ंची पार्सल सेवा सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पंचायतींनी अत्यावश्यक सेवा बंद करू नयेत. इस्पितळे, औषध निर्मिती कंपन्या व इतर अत्यावश्यक सेवेसाठी कामावर जाणार्यांना कुणीही रोखू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.