बारावीच्या प्रश्नपत्रिकेत चूक; विद्यार्थ्यांना गुण मिळणार

0
3

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेतील गणित प्रश्नपत्रिकेमध्ये एका प्रश्नात चूक आढळून आली आहे. विद्यार्थ्यांना तो प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चरणांच्या आधारे गुण दिले जाणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.

राज्यातील बारावीची परीक्षा मार्च 2024 मध्ये घेण्यात आली आहे. बारावीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एका प्रश्नासाठी अपेक्षित उत्तर पर्याय नमूद न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. शालान्त मंडळाने याबाबत चौकशी केली असता गणित प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकाच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. प्रश्नामधील संख्येतील किंचित बदलांमुळे विसंगती निर्माण झाली, असे शेट्ये यांनी सांगितले.

गणिताच्या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षित संख्या प्रदान केली असती, तर विद्यार्थ्यांना उत्तर लवकर ओळखता आले असते. ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रश्न सोडविण्यासाठी चरणांच्या आधारे गुण दिले जातील, असेही शेट्ये यांनी सांगितले.