बारावीचा निका आठवडाभरात जाहीर

0
18

बारावी इयत्तेचा निकाल ह्या आठवड्यात, तर दहावी इयत्तेचा निकाल हा पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे, अशी माहिती गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.
बारावी इयत्तेची परीक्षा ही ५ एप्रिल ते २६ एप्रिल या दरम्यान झाली होती. या परीक्षेला सुमारे १७ हजार विद्यार्थी बसले होते. दहावी इयत्तेची परीक्षा ५ एप्रिल ते २२ एप्रिल ह्या दरम्यान झाली होती. या परीक्षेला सुमारे २१ हजार विद्यार्थी बसले होते.

राज्यात कोरोना महामारी नियंत्रणात असल्याने यंदा नवीन शैक्षणिक वर्ष ६ जूनपासून सुरू होणार आहे. इयत्ता पहिली ते नववीचे वर्ग सोमवार दि. ६ जूनपासून सुरू होणार आहेत. अकरावी तसेच महाविद्यालयीन वर्ग कधी सुरू करायचे हे मात्र अद्याप ठरलेले नाही.

जीसीईटी परीक्षा
२७ व २८ जूनला

यंदा जीसीईटी परीक्षा २७ व २८ जून रोजी होणार आहे. या परीक्षेनंतर व्यावसायिक महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे व्यावसायिक शिक्षण देणार्‍या महाविद्यालयांचे वर्ग हे ऑगस्ट महिन्यातच सुरू होणार आहेत.