बायणातील ‘ती’ घरे पाडण्यास स्थगिती

0
125

>> ५५ घरांवरील गंडांतर तूर्तास टळले

दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी आपला पूर्वीचा आदेश स्थगित ठेवण्याचे मुरगाव नगरपालिकेला आदेश दिल्याने बायणातील त्या ५५ घरांवर आलेले गंडातर तूर्तास टळले. न्यायालयाकडून त्यांच्या घरांना संरक्षण न मिळाल्याने त्यांची बरीच निराशा झाली होती. पण अचानक संध्याकाळी उशिरा दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिल्याने या घरमालकांना दिलासा मिळाला आहे.
काल संध्याकाळी उशिरा दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी आणि डेमोलिशन स्पॉड प्रमुख उदय प्रभु देसाई यांनी काढलेल्या आदेशानुसार आपला दि. ०७/०९/१७ रोजी दिलेला आदेश स्थगित ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. या आदेशात त्यांनी या ५५ घर मालकां पैकी २२ जणांनी आपली घरे कायदेशीर करण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍याकडे अर्ज दाखल केलेले आहे पण या अर्जावर अजून कोणतीच सुनावणी न झाल्याने या घरमालकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी न दिल्याने त्यांना मानवी हक्क व नैसर्गिक न्यायापासून टाळलेले आहे. त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी संधी न दिल्याने त्याना बाजू मांडण्याची संधी देऊन त्याच्या घराविषयी सादर केलेल्या अर्जावर निर्णय होईपर्यंत आपला आदेश स्थगित ठेवावा असे या आदेशात म्हटले आहे.