बायंगिणी प्रकल्पाला श्रीपाद यांचा आताच विरोध का?

0
246

>> कॉंग्रेसचा पत्रकार परिषदेत सवाल

केंद्रीय मंंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी बायंगिणी येथील प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्पाला केलेला विरोध हे केवळ एक नाटक असून आपल्या पुत्राला जिल्हा पंचायत निवडणुकीत निवडून आणण्यासाठीच त्यांनी हे नाटक रचले असल्याचा आरोप काल कॉंग्रेसने केला.

अमरनाथ पणजीकर, कुंभारजुवे गट अध्यक्ष विशाल वळवईकर, सांतआंद्रे येथील एक नेते टोनी फर्नांडिस व सांताकु्रझचे नेते रूडॉल्फ फर्नांडिस यांनी पणजीत संयुक्त पत्रकार परिषदेत हा आरोप केला.

२००३ सालापासून अगदी कालपर्यंत श्रीपाद नाईक यांनी कधीही या प्रकल्पाविरूद्धच्या लढ्यात भाग घेतला नव्हता. मात्र, आता पुत्रासाठी त्यांनी हे प्रकल्पाला विरोध करण्याचे नाटक सुरू असल्याची टीका करण्यात यावेळी आली.

.. तर माघार घेऊ
श्रीपाद नाईक यांचा या प्रकल्पाला खरोखरच विरोध असेल तर त्यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वीच आपले वजन वापरून हा प्रकल्प रद्द करून दाखवावा. त्यांनी तसे करून दाखवल्यास आपण जिल्हा पंचायत निवडणूक रिंगणातून माघार घेण्यास तयार असल्याचे विशाल यांनी सांगितले.