बायंगिणी कचरा प्रकल्पावरून आता माघार नाही ः बाबूश

0
127

बायंगिणी ओल्ड गोवा येथील नियोजित अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या प्रश्‍नावरून माघार घेतली जाणार नाही, अशी माहिती पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे बायंगिणी येथील नियोजित कचरा प्रकल्पावर फेरविचार करण्याची मागणी केली होती. या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला हरित लवाद व गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची निविदा तयार करण्यात आलेली आहे, असे आमदार मोन्सेरात यांनी सांगितले.

पणजी महानगरपालिकेने कचरा प्रकल्प उभारण्यासाठी बायंगिणी ओल्ड गोवा येथे कित्येक वर्षे जमीन ताब्यात घेतली. त्या परिसरात आता इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांनुसार कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांशी सांतइनेज स्मशानभूमीच्या कामावर चर्चा झाली. संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराला स्मशानभूमीच्या कामाला गती देण्याची सूचना ककेल्याचे आमदार मोन्सेरात यांनी सांगितले.