बाणस्तारीत शॉर्ट सर्किटमुळे आग ः घर जळून खाक

0
108

बाणस्तारी आठवड्याचा बाजार भरणार्‍या बाजूला राजेंद्र गोविंद पार्सेकर यांच्या घराला लागलेल्या आगीमुळे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.

प्राप्त माहितीनुसार बाणस्तारी येथील राजेंद्र पार्सेकर यांच्या घराला पहाटे ३.३० वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग लागली त्यावेळी पार्सेकर त्यांच्या कुटुंबियांसह एका खोलीत झोपले होते. गाढ झोपेत असल्याने त्यांना घराला आग लागल्याचे समजले नाही. पंधरा मिनिटांनी शेजार्‍यांनी त्यांना घरावर थाप मारून जागे केले.
शेजार्‍यांनीच अग्नीशामक दलाला पाचारण केले. अग्नीशामक दलाचे जवान पोहचेपर्यंत संपूर्ण घराची राख झाली होती. संपूर्ण घराची राख झाल्यामुळे घरात कपाटात असलेले चार लाख रुपयांचे सोने, त्याचप्रमाणे अंदाजे दहा हजार रुपये, ङ्ग्रिज, टीव्ही, भांडीकुडी, ङ्गर्निचर पूर्णपणे जळून खाक झाल्याने अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने घरात ओट्याखाली असलेल्या गॅस सिलिंडरापर्यंत आग पोहचली नसल्याने सिलिंडराचा स्ङ्गोट झाला नाही.
पंचसदस्य दामोदर नाईक, सुनिल भोमकर यांनी घराला भेट देऊन त्यांची चौकशी केली. यावेळी सुनिल भोमकर यांनी तातडीची पाच हजार रुपयांची मदत केली. सदर घटनेचा पंचनामा माशेल पोलीस आऊट पोस्टचे हवालदार विनोद साळुंके यांनी केला. मीटर बॉक्स लाकडी पार्टीशनला असल्यामुळे आगीने लवकर पेट घेतल्याचे समजले.