म्हापसा-अस्नोडा मार्गावर अस्नोडा येथे बसने दुचाकीला धडक दिल्याने काल झालेल्या अपघातात
दुचाकीस्वार लक्ष्मीकांत ऊर्फ धाकटू शेटकर (45, रा. खोर्जुवे-हळदोणा) हे जागीच ठार झाले. दुचाकीवर मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी स्मृती शेटकर (38) या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात दाखल केले आहे. कोलवाळ पोलिसांनी बसचालक तुकाराम सावंत याला अटक केली. हा अपघात अस्नोडा येथील सेंट क्लारा येथील रस्त्यावर झाला. शुक्रवारी सकाळी 7.45च्या सुमारास हा अपघात झाला. लक्ष्मीकांत शेटकर हे पत्नीसह दुचाकीवरून (क्र. जीए-03-एक्यू-1805) अस्नोड्याहून म्हापसाच्या दिशेने जात होते. पणजी ते वाळपई ही बस (क्र. जीए-03-एन-6019) वाळपईच्या दिशेने जात होती. त्यावेळी हा अपघात घडला.