बसखाली सापडून दाबोळीत दुचाकीचालक जागीच ठार

0
117

दाबोळी विमानतळानजीक राष्ट्रीय महामार्गावर बसखाली चिरडून आल्त दाबोळी येथील नवीन सुरेश नाईक (३१) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. काल दुपारी पावणे बाराच्या दरम्यान हा अपघात घडला.

येथील राष्ट्रीय महामार्गावर दाबोळीहून विमानतळमार्गे दुचाकीवरून जात असताना दुचाकीला क्रेनची धडक बसल्याने दुचाकीचालक नवीन रस्त्यावर कोसळला. यावेळी दाबोळीहून विमानतळमार्गे वास्कोच्या दिशेने जात असलेली जीए – ०२ व्ही – ४३६० या क्रमांकाची बस वेगाने सरळ या दुचाकीस्वारावरून गेल्याने दुचाकीचालक नवीन नाईक जागीच ठार झाला. तर त्याच्या जीए – ०६ – एच – ००६३ क्रमांकाच्या दुचाकीचा चक्काचूर झाला. क्रेन वळण घेत असताना सदर अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
वास्को पोलिसांनी तसेच अग्नीशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण आणले. वास्को पोलीस पुढील तपास करीत आहेत.