बसखाली सापडल्याने युवक मृत्यूमुखी

0
141

कासारपाल-डिचोली येथे रविवारी दुपारी एका मिनी बसखाली चिरडून अजिंक्य (फटी) सुभाष घाडी (१८) या कासारपाल येथील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

सदर युवक कासारपाल येथे मुख्य रस्ता ओलांडून जात असताना तो मिनी बसखाली सापडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला डिचोली इस्पितळात दाखल केले असता त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
डिचोली येथील केशव सेवा साधनाच्या नारायण झांट्ये विशेष मुलांच्या शाळेचा तो विद्यार्थी होता. डिचोली पोलिसांनी मृतदेह बांबोळी येथे शवविच्छेदनासाठी पाठवला असून तपास सुरू आहे.