म्हादईप्रश्‍नी उद्या सुनावणी

0
85

म्हादई प्रश्‍नी कर्नाटकाने लवादाकडे आपले म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. गोव्याने सादर केलेला पाणी साठ्याच्या उपलब्धतेचा अहवाल दिलेल्या वेळेत पूर्ण करून आपली जबाबदारी पूर्ण केलेली आहे.

कर्नाटकाने वेळ मागितल्याने आता सुनावणी ३० ऑगस्टला ठेवण्यात आल्याची माहिती दिल्लीतून देण्यात आली आहे.
गोव्याची सुनावणीसाठी सर्वती तयारी असून लवादाच्या सुनावणीची सर्व प्रकारची सज्जता गोव्याने केलेली आहे.
चेतन पंडित नवे साक्षीदार
जे. ज्योती प्रकाश हे पहिले साक्षीदार म्हणून लवादासमोर होते. त्यांनी प्राथमिक स्तरावर बाजू मांडली होती व अभ्यासपूर्ण पध्दतीने उलटतपासणीला ते सामोरेही गेले होते. मात्र त्यांना सातत्याने सुनावणीला उपलब्ध होणे शक्य नसल्याने त्यांना या प्रकरणातून सुट देण्यात आली. आता चेतन पंडित हे गोव्याचे साक्षीदार म्हणून लवादासमोर उभे रहाणार असून त्यासाठी सर्व ती तयारीही केलेली आहे.
कर्नाटकाचे दबाव तंत्र
भारताचे अतिरिक्त सॉलीसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी गोव्यातर्फे प्रभावी युक्तीवाद करत गोव्याला पहिला विजय प्राप्त करून दिल्याने कर्नाटकाचे धाबे दणाणले आहेत. नाडकर्णी यांना या सुनावणीतून बाहेर ठेवण्यासाठी कर्नाटकाने जबरदस्त तयारी केली असून अतिमहनीय व्यक्तींना गुंतवून नाडकर्णी यांना गोव्याची बाजू लढवण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्याची चाल खेळली जात आहे.