बनावट अकाऊंट प्रकरणी एकास अटक

0
13

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाने बनावट व्हॉट्‌सऍप अकाऊंट उघडणार्‍या एका भामट्याला गोवा पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने औरंगाबाद येथून ताब्यात घेतले. आरोपीचे नाव सय्यद एजाज असे असून, हा भामटा मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट व्हॉट्‌सऍप अकाऊंट उघडून राजकीय नेत्यांना व नागरिकांना त्यावरून गेले कित्येक दिवस संदेश पाठवत होता. त्याशिवाय या भामट्याने गोवा पोलीस महासंचालकांच्या नावानेही असेच एक बनावट व्हॉट्‌सऍप अकाऊंट उघडले होते.