देशात २४ तासांत नवे १२ हजार रुग्ण

0
22

देशात कोरोनाचा वाढता संसर्ग कायम असून, मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. गेल्या २४ तासांत भारतात १२ हजार ८४७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून, १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील २४ तासांत ७ हजार ९८५ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले. सध्या देशात ६३,०६३ एवढे सक्रिय कोरोनाबाधित आहेत, तर दैनंदिन संक्रमण दर २.४७ टक्के एवढा आहे.