बंडोबा थंडोबा झाले!

0
95

फ्रान्सिस डिसोझांना झाली उपरती
लंडनवारी अर्ध्यावर टाकून राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर दावा असल्याची आक्रमक भाषा गेले दोन दिवस केलेल्या फ्रान्सिस डिसोझा यांनी अखेर काल लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिल्याने त्यांचा बंडाचा बार फुसका ठरला.नवे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची निवड लोकशाही पद्धतीने झाल्याने आपणही त्यांच्या निवडीला पाठिंबा दिलेला असून आपला विरोध आता मावळला आहे. नव्या मंत्रिमंडळात आपण मंत्री म्हणून पद स्वीकारणार असल्याचे फ्रान्सिस डिसोझा यांनी काल राजभवनवर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शपथग्रहण सोहळा सुरू होण्यापूर्वी पत्रकारांनी त्यांना त्याविषयी छेडले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. पक्षाचे मंत्री व आमदार यांना विश्‍वासात न घेता नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात येत असल्याचे वृत्त आपण विदेशात असताना आपणाला मिळाले होते. त्यामुळे आपण तातडीने विदेशातून गोव्यात आलो होतो. मात्र, आता ही निवड पक्षाच्या सर्व आमदारांना विश्‍वासात घेऊन करण्यात आल्याने आपण या निवडीला विरोध करण्याचा प्रश्‍नच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.