Home बातम्या प्रीमियम पेट्रोलच्याकिमतीत वाढ

प्रीमियम पेट्रोलच्याकिमतीत वाढ

0

जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम आता भारतातील इंधन दरांवर दिसू लागला आहे. तेल कंपन्यांनी काल प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत 2.35 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली. याशिवाय औद्योगिक डिझेलच्या दरात देखील 22 रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, नियमित वापरल्या जाणाऱ्या साध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्याने जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी कालपासून भारतात प्रीमियम पेट्रोलच्या दरात 2.35 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. बीपीसीएलच्या ‘स्पीड’, एचपीसीएलच्या ‘पॉवर 95′ आणि आयओसीएलच्या ‘एक्सपी 95′ पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.09 रुपये ते 2.35 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या साध्या पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 28 फेब्रुवारी रोजी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आखाती देशांमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे जगातील 20 टक्के तेल आणि वायू वाहतूक करणारा ‘होर्मुझची समुद्रधुनी’ जवळपास बंद झाली असून पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. एचपीसीएलने पेट्रोल पंप मालकांना ‘पॉवर 95′ च्या दरात 2 रुपयात वाढ झाल्याचे कळवले असून, नवीन दर लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.