प्रशासनात सुधारणा करण्यासाठी स्टार्टअपची मदत घेणार ः मुख्यमंत्री

0
41

राज्य सरकारच्या प्रशासनात सुधारणा घडवून आणून प्रशासनाला गती देण्यासाठी सरकार स्टार्टअपची मदत घेण्याबाबत विचार करीत असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. त्याद्वारे सहपरिसंस्था वातावरण निर्माण होण्यास मदत होऊ शकेल असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. ‘अंतप्रेरणा’ ह्या स्टार्टअप संमेलनात बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.

गोवा सरकारची स्वयंपूर्ण योजना ही पहिल्या टप्प्यात शेती, फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय आदींपुरती मर्यादित होती. मात्र, पुढील टप्प्यात विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांकडून दिल्या जाणार्‍या सेवांचाही त्यात समावेश करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. राज्यातील गावागावात स्टार्टअप कक्ष व स्टार्टअप कंपन्या उभ्या करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. ह्या संमेलनात जी विविध सत्रे झाली ती विविध स्टार्टअप व विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी हींींि://ुुु.रपींहरिीशीपर.ळप/ वर उपलब्ध करून दिली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.