राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोवा प्रभारी भारती चव्हाण व प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांच्यातील मतभेद पराकोटीला पोचले असून सिरसाट यांनी पक्षहित नजरेसमोर ठेऊन चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
चव्हाण यांनी राष्ट्रवादीला पाच जागा सध्या मिळाल्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात कॉंग्रेसने याबाबतीत अधिकृत असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे सिरसाट यांनी सांगितले.
चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या मतदारसंघात अनेक उमेदवार तयार झाले होते. परंतु ३ मार्च रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल याची शाश्वती नसल्याने राष्ट्रवादी दावा करीत असलेल्या मतदारसंघातील उमेदवार सैरभैर झाले आहेत.
सांगे मतदारसंघातून युरी आलेमाव यांना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध आहे.