गोव्याचाही समावेश
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून किनारी राज्यांसाठी बनविण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कार्डांचे वितरण आजपासून सरू होणार आहे. अंदमान येथे आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते वितरणाचा शुभारंभ होईल.
या योजनेवर सुमारे २१६.३१ कोटी रु. खर्च करण्यात येणार आहेत. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांत तसेच अंदमान निकोबार, पुडुचेरी, लक्ष्वद्वीप आणि दमण दिव या संघप्रदेशांत ही स्मार्ट कार्ड्स लोकांना देण्यात येतील. १८ वर्षांवरील व्यक्तींना ही स्मार्ट काडर्स देण्यात येतील.
आतापर्यंत सुमारे १.२ कोटी लोकांची माहिती गोळा करण्यात आली असून ५ लाख कार्ड्स तयार केली आहेत.