प्रदूषण नियंत्रणच्या बैठकीत कोळसा प्रदूषणावर चर्चा

0
134

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बैठकीत कोळसा प्रदूषणाच्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. एमपीटीला कोळसा वाहतुकीसाठी कंटेनरचा वापर, ट्रकांवर आवरण अनिवार्य आणि कोळशाची हाताळणी क्लोज डोम पध्दतीचा वापर करण्याची सूचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सोनशीतील खाणींना जारी करण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या अर्जावर पुढील बैठकीत निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले आहे. १९९४ च्या कायद्याखाली येणार्‍या १७ खाणींचे परवाने रद्द का केला जाऊ नये, अशी विचारणा मंडळाने केली होती. १९९४ च्या कायद्याखाली येणार्‍या खाणींबाबत निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेण्यावर चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.