प्रतिज्ञापत्र योजनेला जनतेचा प्रतिसाद

0
102

मामलेदार कार्यालयात फक्त ५० रुपयांत प्रतिज्ञापत्रे उपलब्ध करून देण्याच्या योजनेची हळूहळू जागृती होऊ लागली असून गेल्या महिनाभरात उत्तर गोव्यातील सहाही मामलेदार कार्यालयांत मिळून १९४६ प्रतिज्ञापत्रे वितरित केल्याची माहिती जिल्हाधिकारी लीना मोहनन यांनी दिली.या योजनेंतर्गत सर्वांत जास्त म्हणजे ७७३ प्रतिज्ञा पत्रांची विक्री डिचोली मामलेदार कार्यालयात झाल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी वरील सुविधा नोटरीकडेच उपलब्ध होती. त्यामुळे नागरिकांना प्रतिज्ञापत्रासाठी २०० ते ३०० रुपये खर्च करावे लागत होते. या योजनेमुळे जनतेची चांगली सोय झाली आहे.