पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांनी वाढ

0
91

पेट्रोल-डिझेलवर उत्पादन शुल्क दोन रुपयांनी वाढवण्यात आले आहे. मात्र, या वाढलेल्या शुल्काचा बोझा जनतेवर पडणार नाही.
इंधनांच्या उत्पादन शुल्कात केलेली ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. उत्पादन शुल्क वाढवल्याने ही वाढ होणार आहे. परंतु, यामुळे सध्या तरी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत काहीही फरक पडणार नाही. या उत्पादन शुल्क दरवाढीचा उपयोग पायाभूत सुविधा उभारण्यासाठी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाची किंमत घसरलयाने पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आणखी घट होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.