पोलीस खात्यातील निरीक्षकांच्या बदल्या

0
59

पोलीस खात्यातील १७ निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश काल काढण्यात आला.
रामचंद्र शिरोडकर यांची आर्थिक गुन्हे विभागातून पणजी (टीसी) येथे, सोमनाथ माजीक यांची पणजी (टीसी) येथून स्पेशल ब्रांच, हरिश गांवस यांची स्पेशल ब्रांच डिचोली येथून वाळपई पोलीस स्थानक, शिवराम वायंगणकर यांची मायणा-कुडतरी पोलीस स्थानक येथून स्पेशल ब्रांच मुख्यालय तसेच स्पेशल ब्रांच फोंडा, प्रवीण गावस यांची स्पेशल ब्रांच फोंडा येथून सांगे पोलीस स्थानक, सचिन पानलकर यांची सांगे पोलीस स्थानकावरून पणजी मुख्यालय, दत्ताराम राऊत यांची तेरेखोल किनापट्टी पोलीस स्थानकावरून जुने गोवे पोलीस स्थानक, कृष्णा सिनारी यांची जुने गोवे पोलीस स्थानक येथून पणजी किनारपट्टी सुरक्षा पोलीस स्थानक, विल्सन डिसोझा यांची पणजी किनारपट्टी पोलीस स्थानकावरून स्पेशल ब्रांच मुख्यालय, राजेश कुमार यांची गुन्हा अन्वेषण, रायबंदर येथून तेरेखोल किनारपट्टी पोलीस स्थानक, गुरूदास कदम यांची विमानतळ पोलीस स्थानक येथून कुंकळ्ळी पोलीस स्थानक, थेरोन डिकॉस्टा यांची कुंकळ्ळी येथून गुन्हा अन्वेषण विभाग रायबंदर, सचित नार्वेकर यांची मडगाव पोलीस स्थानकावरून आर्थिक गुन्हे विभाग, पणजी, तुकाराम चव्हाण यांची एमटी विभाग पणजी येथून कोलवा पोलीस स्थानक, आनंद शिरोडकर यांची कोलवा पोलीस स्थानक येथून एफआरआरओ पणजी व जितेंद्र नाईक यांची एसओ विभाग पणजी मुख्यालय येथून मडगाव पोलीस स्थानक येथे बदली करण्यात आली.