अफगाणिस्तानात आंदोलकांवर तालिबान्यांकडून गोळीबार

0
40

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांकडून अफगाण नागरिकांवर अत्याचार सुरू झाले आहेत. शांततेची चर्चा करणार्‍या तालिबानकडून अफगाण नागरिकांवर गोळीबार केला जात आहे. अफगाण नागरिक आता तालिबानीविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. तसेच दुसरीकडे तालिबानच्या राजवटीला आव्हान देण्यासाठी अहमद शाह मसूद यांच्या पंजशीर प्रांतात तालिबानविरोधक जमत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा नॉदर्न अलायन्सच्या झेंड्याखाली तालिबानविरोधक एकत्र येत आहेत.

तालिबानला अद्याप पंजशीर प्रांतावर त्यांना ताबा मिळवता आला नाही. चारही बाजूने डोंगराळ भाग असणार्‍या या प्रांतात तालिबानविरोधक जमत आहेत. अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह, अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद आणि बल्ख प्रांताचे माजी राज्यपाल मोहम्मद नूर यांच्याकडे तालिबान विरोधकांचे नेतृत्व आहे. अमरुल्लाह सालेह यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचा राष्ट्रपती घोषित करून तालिबानला आव्हानच दिले आहे.