पोलीस खात्याकडून सीमकार्ड डिलर्सना केवायसीबाबत समज

0
89

मोबाईल कंपन्यांच्या सीम कार्डांची विक्री करणारे डिलर सीमकार्डे विकत घेणार्‍या ग्राहकांकडून त्यांची खरी ओळख मिळवण्याच्या बाबतीत उदासीन असतात. त्याचा फायदा उठवत गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले खोट्या नावांच्या आधार घेत सीम कार्डे मिळवतात व नंतर ती कार्डे मोबाईलमध्ये घालून आर्थिक गुन्हे व अन्य प्रकारचे गुन्हे करतात. अशा लोकांच्या शोधही घेणे पोलिसांसाठी एक आव्हान असते, असे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. सिम कार्डे वितरीत करणार्‍या डिलर्सना बोलावून आणून समज देण्यात आली असून केवायसीचे पालन करण्याची सूचना करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
गेल्या वर्षी १५ जणांना अटक
खोट्या नावाचा वापर करून सीम कार्डे मिळवून नंतर गुन्हेगारी कृत्ये केलेल्या १५ आरोपींना गेल्या वर्षी गोवा पोलिसांनी पकडल्याची चंदर यांनी यावेळी सांगितले.
या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांना सीम कार्डे वितरीत करताना काळजी घेण्याची सूचना पोलिसांनी डिलर्सना केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. गेल्या वर्षीही आम्ही अशी सूचना केली होती. पण डिलर्सनी त्याचे पालन केले नाही. केवायसीचे पालन करण्याची गरज असल्याचे चंदर यांनी सांगितले.