पोलिसाला मारहाण प्रकरणी एकास अटक

0
90

कुडचडे वाहतूक पोलीस स्थानकाचे हवालदार अनिल रामा महालेनकर यांना ड्युटीवर असताना मारहाण केल्याप्रकरणी तारीमळ, सांगे येथील डॉम्निक लॉरेन्स फर्नांडिस (३९) याला पोलिसांनी काल अटक केली. आज त्याला न्यायालयात रिमांडसाठी नेण्यात येणार आहे. काल संध्याकाळी ४ वाजता हवालदार महालेनकर सहकार्‍यांसह वाहनांची तपासणी करीत असताना संशयिताने हल्ला केला.