पेन, विराट सर्वोत्तम कप्तान ः फैझ फझल

0
140

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टिम पेन व टीम इंडियाचा विद्यमान कप्तान विराट कोहली हे दोघे सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम कसोटी कर्णधार आहेत, असे टीम इंडियाचा माजी सलामीवीर व देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवी खेळाडू फैझ फझल मत व्यक्त केले आहे.

या वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणार आहे. त्यावेळी या दोघांमधील द्वंद्व पहायला मिळणार आहे. भारताने मागील वर्षी ऑस्ट्रेलियन भूमीवर मालिका जिंकली होती. दोन्ही पैकी एक निवडायचा झाल्यास फझल याने पेन याच्या नेतृत्वाला पसंती दिली आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाने पेनच्या नेतृत्वाखालीच प्रतिष्ठेची ऍशेस आपल्याकडे राखली होती. २००१ साली स्टीव वॉ याने असा कारनामा केला होता. यानंतर कांगारूंच्या एकाही कर्णधाराला ऍशेस राखणे शक्य झाले नव्हते.

२०१६ साली फझल याला टीम इंडियात संधी मिळाली होती. झिंबाब्वेविरुद्धच्या एका वनडे सामन्यात अर्धशतक लगावून देखील पुन्हा कधीच त्याला टीम इंडियाकडून खेळता आले नाही. राष्ट्रीय संघाकडून अधिक सामने खेळण्याची संधी न मिळाल्याबद्दल त्याने निराशा व्यक्त केली तसेच किमान एका लढतीत तरी भारताचे आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधित्व करता आल्याने समाधान व्यक्त केले.