जमीन विभागणीविषयक प्रक्रिया सुटसुटीत होणार

0
76

जमिनीच्या विभागणी संबंधीचे दाखले उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचे ठरविले असून पुढील आठवड्यात प्रायोगिक तत्वावर पणजीतील अर्जधारकांना त्यांनी दाखल्यासाठी सादर केलेल्या अर्जावरील प्रक्रियेची माहिती एसएमएसद्वारे कळविली जाईल.या निर्णयामुळे अर्जधारकांना चौकशीसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. वरील दाखला वितरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान सहा महिने लागतात. वरील योजना यशस्वी झाल्यास जलद गतीने दाखले मिळणे शक्य होईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. पुढील महिनाभरात संपूर्ण तिसवाडी तालुक्यातील अर्जधारकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.