पूजा शर्माच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निवाडा ठेवला राखीव

0
14

आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांच्या घराच्या मोडतोड प्रकरणातील संशयित पूजा शर्मा हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी काल पूर्ण झाली. या प्रकरणी न्यायालयाने निवाडा राखून ठेवला आहे. येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयित पूजा शर्मा हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पूजा शर्मा हिने जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सुनावणी पूर्ण झाल्याने आता निवाडा काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.