पुढील चार दिवस पावसाची शक्यता

0
278

पश्‍चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यातील काही भागात आगामी चार दिवस जोरदार पावसाचा इशारा काल हवामान खात्याने दिला आहे.

राज्यातील हवामानात बदल झाला असून गुरूवारी मध्यरात्रीपासून काही भागात पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पणजी परिसराला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. मागील चोवीस तासांत १.३१ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात १९ ते २१ सप्टेंबर या काळात काही ठिकाणी चोवीस तासात २०.५ सेंटीमीटरपर्यत पाऊस पडू शकतो. या पार्श्‍वभूमीवर केसरी अलर्ट जारी केला आहे. वार्‍याचा वेग वाढणार असून ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. या काळात मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मोसमी पाऊस १५० इंचाच्याजवळ
राज्यातील मोसमी पाऊस दीडशे इंचांजवळ येऊन ठेपला आहे. राज्यात आत्तापर्यंत १४७.६ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ३१ टक्के जास्त आहे. उत्तर गोव्यात ३३ टक्के आणि दक्षिण गोव्यात २९ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.

पणजीत ३३ तासात
४.३८ इंच पाऊस
पणजी भागाला जोरदार पावसाचे झोडपून काढले. पणजीत मागील ३३ तासांत ४.३८ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, चोवीस तासांत ३.३१ इंच पावसाची नोंद झाली होती. काणकोण येथे ३.०७ इंच, मुरगाव येथे २.२७ इंच, वाळपई येथे १.४२ इंच, दाभोली येथे १.३७ इंच, पेडणे येथे १.१९ इंच पावसाची नोंद झाली आहे.