पालिका आरक्षणातील घोळाबाबत नगरविकासमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

0
168

>> आमदार कार्लुस आल्मेदा यांची मागणी

येत्या नगरपालिका निवडणुकांसाठीचे आरक्षण व प्रभागांची फेररचना करण्याचे काम करताना सगळा घोळ घालण्यात आला आहे. त्याची जबाबदारी स्वीकारून नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काल भाजप आमदार कार्लुस आल्मेदा यानी केल्याने सत्ताधारी भाजपमध्ये खळबळ माजली आहे.

यापूर्वी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनीही नगरपालिका प्रभागांचे आरक्षण व फेररचनेचे काम योग्य प्रकारे झाले नसल्याचा आरोप करून त्याविषयी नापसंती व्यक्त केली होती.
विरोधी पक्षांमध्येही प्र्रभागांचे आरक्षण व फेररचनेच्या प्रश्‍नावरून प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर आता सत्ताधारी पक्षातील आमदारांनीही वरील प्रकरणी नाराजी व्यक्त केल्याने सत्ताधारी भाजपमध्ये खळबळ माजली आहे.