पालिकांत नागरिक सहभागासाठी कायद्यात दुरुस्तीचा विचार

0
91

>> उपमुख्यमंत्री : पालिकांना ४३ ट्रक वितरित

 

पालिका विकास कामात नागरिकांचा सहभाग करण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक प्रभागांत नागरिक देखरेख समिती स्थापन करण्यासाठी येत्या विधानसभा अधिवेशनात पालिका कायद्यात दुरुस्ती करण्याचा विचार आहे तसेच नगरसेवकांनी आपली मालमत्ता जाहीर करण्याची सक्ती येईल असे उपमुख्यमंत्री फ्रांसिस्क डिसोझा यांनी सांगितले.
गोव्यातील पालिकांना एकूण ४३ ट्रक देण्यात आले.कचरा नेण्यासाठी गोव्यातील नगरपालिकाना मिनी ट्रक देण्याचा कार्यक्रम रवींद्र भवनात आयोजित केला
होता.
मडगाव व मुरगाव पालिकांना प्रत्येकी सात सात मिनी ट्रक उपमुख्यमंत्र्याहस्ते सुपुर्द करण्यात आले. त्यावेळी पालिका प्रशासन संचालक एल्विस गोम्स, नगराध्यक्ष बबिता प्रभुदेसाई आदी उपस्थित होते. पालिका बैठकांत नागरिकांनाही सहभागी करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचा विचार आहे. त्यातून पारदर्शकता येईल व विकासासाठी उपयोग होईल असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले, पालिकानी कराची थकबाकी वसूल करण्यासाठी जलदगतीने पाऊले उचलली पाहिजेत. त्याचबरोबर महसूल व वसूली ऑन लाईन सुरू करावी व नोटीसा पाठवाव्यात.
पालिकानी या मिनी ट्रकचा योग्य प्रकारे उपयोग करावा. आवश्यक असल्यास मडगांव पालिकेला कॉम्पॅक्टर्स देण्यात येतील. थर्माकोल कचरा प्रक्रियेसाठी पेडणे येथे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्याला किमान ४ टन कचरा हवा असतो असे ते म्हणाले.
डॉ. बबिता प्रभु देसाई यानी कचरा समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली. मडगाव पालिका सीमेलगत असलेल्या पंचायतीतील केरकचरा पालिका विभागात आणून टाकला जातो. त्यावर उपाय सरकारने शोधावा.