पार्से युथ संघ क्रिकेट विजेता

0
89

दाभोलकर ब्रदर्सला १६ धावांनी हरवून पार्से युथ संघाने एस. के. ब्रदर्स पार्से आयोजित पेडणे तालुका मर्यादित टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद प्राप्त केले. विजेत्याना रु. २२,२२२ आणि चषक तर उपविजेत्यांना रु. ११,१११ आणि चषक देण्यात आले. प्रमुख पाहुण्या, माजीमंत्री सौ. संगिता परब आणि सचिन परब यांच्याहस्ते पुरस्कार वितरण झाले. माजी सरपंच गुरुदास पांडे, लक्ष्मण ओटवणेकर, रोहिदास आरोलकर, शशिकांत कांबळी आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपांत्य फेरीतील पराभूत संघ, साई बॉयज मांद्रे आणि भाइडवाडा चोकर्स यांना प्रत्येकी रु. १,१११ तसेच राजू दाभोलकर (मालिकावीर-दाभोलकर ब्रदर्स/, राम नागवेकर (सामानवीर-पार्से युथ), दत्ताराम महाले (क्षेत्ररक्षक-दाभोलकर ब्रदर्स) यांना वैयक्तिक तसेच सुनिल नाईक आणि निलेश पार्सेकर याना उत्तम समालोचक म्हणून बक्षीस देण्यात
आली.
पार्से येथील काजिरो मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पार्से युथ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीत पाच षटकात ३ बाद २८ धावा केल्या आणि प्रतिस्पर्धी दाभोलकर ब्रदर्स संघाला ३ बाद ४२ धावांवर
रोखले.