फोंडा अपघातातील मृत युवकाची ओळख पटली

0
4

बेतोडा फोंडा येथे शनिवारी संध्याकाळी कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात ठार झालेल्या युवकाची ओळख पटली असून त्याचे नाव तौफिक सँडी (23) असून तो वर्णापुरी वास्को येथील होता. दुचाकीमागे बसलेला त्याचा मित्र आशिद मकबूल मुजावर याच्यावर गोमेकोत उपचार घेत आहे. अपघाताचा गुन्हा नोंद करण्यासाठी फोंडा पोलीस तपास करीत आहेत. धारबांदोडा येथे वाहन पोहचून माघारी जात असताना दुचाकीची धडक विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला बसली. सूचना फलक लावले नसल्याने हा अपघात झाला.

धारबांदोडा अपघातप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा नोंद
पणसुले – धारबांदोडा येथे शनिवारी झालेल्या ट्रक व स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातप्रकरणी ट्रकचालक सोमण्णा पाटील (सध्या राहणारा मडगांव, मूळ बेळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. अपघातात स्कूटरस्वार उन्नती गावडे ही युवती गंभीर जखमी झाली होती. जखमी उन्नतीवर गोमेकॉत उपचार सुरु आहेत. दोन्ही अपघाताचा पंचनामा साहाय्यक उपनिरीक्षक सुधाकर गावकर यांनी केला आहे.