पाकिस्तानचे प्रसिद्ध अणूशास्त्रज्ञ अब्दुल कादीर खान यांचे निधन

0
47

पाकिस्तानचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादीर खान (८२) यांचे काल रविवारी प्रकृती बिघडल्यान निधन झाले. खान यांना पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे जनक मानले जाते.
पाकिस्तानला मुस्लिम जगातील पहिले अण्वस्त्र संपन्न देश बनवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

पाकिस्तानी जनता त्याच्याकडे नायक म्हणून पाहतहोती. डॉ. खान यांची शनिवारी प्रकृती खालावली. यानंतर त्यांना रविवारी सकाळी सहा वाजता रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांना श्‍वास घेण्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. परंतु स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजता त्यांचे निधन झाले.